तस्लिमा नसरीन यांच्या व्हीसा मुदतीत वाढ

नवी दिल्ली, दि. 20 – प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांच्या व्हिसाची मुदत आणखी एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिह यांनी या प्रस्तावावर आज स्वाक्षरी केली. तस्लीमा या सध्या स्वीडनच्या नागरीक आहेत. त्याच देशाच्या पासपोर्टावर त्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन 2004 पासून त्यांच्या व्हिसात वेळोवेळी वाढ करण्यात येत आहे.
तस्लमींना बांगलादेशात तेथील इस्लामिक कट्टरपंथीयांनी धमक्‍या दिल्यानंतर त्यांनी 1994 पासून भारतात आश्रय घेतला होता. तथापी येथेही त्यांना इस्लामिक कट्टरपंथीयांनी उपद्रव दिल्यानंतर त्यांना भारताबाहेर बराच काळ काढावा लागला. स्वीडन सरकारने त्यांना त्यांच्या देशाचे कायम नागरीकत्व दिले आहे. तथापी आपल्याला भारताचे कायम नागरीकत्व मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. तसा अर्ज त्यांनी भारत सरकारकडे केला आहे पण गृहमंत्रालयाने त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. भारतात आपल्याला राहता येणार नसेल तर आपण आपली सांस्कृतिक ओळखच विसरून जाऊ अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली असून आपल्याला कोलकाता शहरातच राहणे आवडेल असे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)