तळ्यातील पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथील मासे व्यवसायिक गणेश राजेंद्र शिंदे (भोई) (वय 28) यांचे बुधवारी (दि. 23) सायंकाळी मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या तळ्यातील पाण्यामध्ये पडून मृत्यू झाला.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाजवळ मच्छतळे आहे. तेथून जाणाऱ्या व्यक्तीने तळ्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसम बुडाल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव यांना दिली. पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव हे महाविद्यालयाच्या तळ्यावर गेले. तेथे मासे पकडायच्या जाळ्यामध्ये अज्ञात इसमाचा पाय अडकल्याचे त्यांना दिसून आले. आजुबाजूच्या गावांमध्ये पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतदेह कळंब येथील गणेश शिंदे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मंचर येथील रुग्णवाहिकाचालक अमित काटे यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गणेश शिंदे यांचा मृतदेह आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत गणेशाच्या पश्‍चात एक मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)