तळेघर येथील वरसुबाई मातेची यात्रा उत्साहात

तळेघर- आंबेगाव तालुक्‍यातील तळेघर गावातील वरसुबाई मातेची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्त मंदिर व आसपासच्या परिसरात आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेत अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. श्रीपद महाराज कुडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहची सांगता झाली. यात्रा काळात क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार व रविवारी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली. शनिवारी सकाळी देवीचा अभिषेक व महापूजा झाली. मंदिरापासून देवीच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतिषबाजीत गावातून काढण्यात आली. यात्रेनिमित्त स्व. तुकाराम खेडकर सह स्व. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा बघण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती सुभाष मोरमारे, आंबेगाव तालुक्‍याचे उपसभापती नंदकुमार सोनावले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती सलीम तांबोळी, सरपंच चंद्रकांत उगले, उपसरपंच ज्ञानेश्वर मेचकर व परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. लहान पहिलवानांपासून ते मोठ-मोठ्या नावाजलेल्या पहिलवानांनी यावेळी हजेरी लावली. 50 ते 10 हजार रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या पहिलवानांनी पटकाविल्या. यावेळी पंच म्हणून प्रवीण उगले, शांताराम इंष्टे, तुळशीराम मेचकर, शांताराम मोहंडूळे, शांताराम इंष्टे यांनी काम पाहिले. तर यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सखाराम मोहंडूळे, तुकाराम मोरमारे, रमेश इंष्टे, हनुमंत इंष्टे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती इंष्टे, सुरेश भवारी, तुळशीराम इंष्टे यांनी प्रयत्न केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)