तळेघरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात

तळेघर-आदिवासी भागात दिवसेंदिवस घनकचरा व्यवस्थापन ही समस्या वाढत चालली आहे. आदिवासी भागात लोकांना कचरा कुठे टाकावा ही समस्या भेडसावत आहे. कारण या भागात कुठल्या ही प्रकारची घंटागाडी उपलब्ध नाही. नाविलाजाने लोकांना कचरा अन्य जागेवर टाकावा लागतो. त्यामुळे गावात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न उद्‌भवतो आहे. त्यामुळे गावातल्या लोकांच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होतो. हिच गोष्ट तळेघर ग्रामपंचायतीने लक्षात घेऊन गावात 14 वा वित्त आयोगाच्या सन 2016-17 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी गावात 10 कचरा कुंड्या मंजूर करून घेतल्या. लोकांना त्यांचे महत्त्व सांगितले.हे कचरा कुंड्या गावात ठराविक ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.आणि कचरा याच कचरा कुंडीत टाकावा, असे आव्हान करण्यात आले. या कुंडीतल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, असे सरपंच चंद्रकांत उगले यांनी सांगितले. या कचराकुंड्या गावात ठेवण्यात येणार आहेत. यावेळी माजी समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, माजी उपसभापती सलीम तांबोळी, समाज कल्याण निरीक्षक हनुमंत इष्टे, ग्रामसेवक कवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जगताप, सखाराम मोहंडूळे, तुळशीराम इष्टे, तानाजी राक्षे, सुहास रोंगटे, नंदा मोरमारे, निता मोहंडूळे यांच्या हस्ते झाले. या वेळी सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ तळेघर हे सर्व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)