तळेगाव शहरात 250 पोलिसांचा “रुट मार्च’

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी 250 सशस्त्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा "रुट मार्च.'
  • छावणीचे स्वरूप : गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर संचलन

तळेगाव दाभाडे,  (वार्ताहर) – येथे गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर सोमवार दि. 28 ला सायंकाळी साडेपाच वाजता शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच संशयास्पद व्यक्‍ती व वस्तूंवर करडी नजर ठेवून समाज विघातक शक्‍तींचा बीमोड करण्यासाठी 250 सशस्त्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “रूट मार्च’ काढण्यात आला. तळेगाव शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या सूचनेनुसार देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील, बी. आर. पाटील, अरुण मोरे, सुरेश निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे, वैभव सोनवणे, विठ्ठल वडेकर, युवराज वाघमारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. शहरातील जिजामाता चौक, श्री डोळसनाथ महाराज मंदिर, बाजार पेठ, मारुती मंदिर चौक असा “रुट मार्च’ काढला. जिजामाता चौकात या रुट मार्चची सांगता झाली. अचानक शेकडो पोलीस जवान पाहून नागरीक प्रथम चक्रावून गेले. नंतर महिला व मुलींनी बिनधास्तपणे या जवानांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)