तळेगाव परिसरात शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

तळेगाव ढमढेरे- शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी आणि इतर परिसरांमध्ये पावसाने पाठ दाखवल्याने बळीराजा पाणी टंचाईच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहे. इतर व्यावसायांनाही याची झळ बसली असून रोजच्या ढगाळ वातावरणामुळे आज पाऊस होईल की नाही? असा अंदाज वर्तवित आहेत.
दररोज असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रिमझिम पावसाच्या सरी अधून-मधून ओसरतात. पिकांना ते मारक ठरते. या वातावरणामुळे मनुष्याच्या आरोग्य धोक्‍यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरीवर्ग यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कारण तालुक्‍यातील विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे.
दररोज आकाशात जमा होणारे ढग पाहून रिमझिम पावसाने जमिनीची तहान भागात नाही. तर तळ गाठलेल्या पाण्याच्या पातळ्या कशा भरून येणार? असा प्रश्‍न पडत आहे. म्हणून दमदार पावसाच्या आशेवर शेतकरीवर्ग राहिला आहे. पावसाच्या पाण्याचा प्रश्न येथे राहणाऱ्या रहिवाशांना भेडसावत आहे. त्यांनी घेतलेल्या बोअरवेलच्या पाण्याच्या पातळ्यांनी तळ गाठला आहे.
विकत पाणी पिण्याबरोबर वापरासाठी घेण्याची वेळ शकते. अजूनही मुसळदार पावसाची वाट पाहत आहे. भीमा नदी शेजारून वाहत असल्यामुळे उर्वरित पिकांना जीवदान दिल्याचे शेतकरीवर्गात बोलले जात आहे. तरी संपूर्ण उन्हाळा शेताला नदीवरून पाणीपाईप लाईनद्वारे पुरवले जात आहे. पण खरी गरज पावसाची होती. या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून तरी आला नाही. भविष्यात मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे.

  • रिमझिममुळे रस्ते बनले चिखलमय
    तळेगाव ढमढेरे ते एलएनटी फाटा या परिसरात पीएमआरडीच्या माध्यमातून चाललेल्या रस्त्यावर रिमझिम होणाऱ्या पावसामुळे चिखल पसरल्याने रस्ता निसरडा झाला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी लोकांवर शेजारून वाहन गेल्याने अंगावर चिखल उडत आहेत. या रस्त्यावर सर्वत्र मुरुमामुळे चिखल झाला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)