तळेगाव ढमढेरे शाळेतील विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

तळेगाव ढमढेरे -कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे क्रमांक 1 शाळेतील विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत मंथन परीक्षेत एकूण 12 तर एनएसएसई परीक्षेत एकूण 31 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत असल्याची माहिती मुख्याध्यापक संभाजी कांबळे यांनी दिली.
यामध्ये इयत्ता दुसरीतील यश कुंभार (188), कृष्णा कदम (180), प्रदीप चव्हाण (168), सोहम हिंगसे (160), सार्थक केदारी (152), श्रीनाथ तोडकर (150), इयत्ता तिसरी- कैवल्य आखाडे (262), सोहम कुंभार (262), यशोदीप मोडक (238), चैतन्य गंगात्रे (228) इयत्ता चौथी -अथर्व केदारी (242) इयत्ता पाचवी- प्रीतम बागले (272). या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत उत्तम यश मिळवले. तसेच एनएसएसई परीक्षेत इयत्ता पहिली- सार्थक गोंदे (190), समर्थ कुंभकर्ण (186), ओमकार गोफणे (184), महेश निम्मनवाड (184), अथर्व ढमढेरे (180), सोहम शेवकर (180), वरद घुमे (178). इयत्ता दुसरी- यश कुंभार (192), कृष्णा कदम (186), प्रदीप चव्हाण (188), सोहम हिंगसे (182), श्रीनाथ तोडकर (178), अनिकेत डोंगरे (176), फराज बागवान (172). इयत्ता तिसरी- सोहम कुंभार (186), कैवल्य आखाडे (178), यशोदीप मोडक (174), हर्षवर्धन ढमढेरे (168), चैतन्य गंगात्रे (168), वेदांत ढमढेरे (166), साई गोरे (164). इयत्ता चौथी – अथर्व केदारी (178), यश भालके (162) इयत्ता पाचवी – प्रीतम बागले (194), सिद्धार्थ पारखे (170), श्रीनिवास तौर (152), रोहन भुजबळ (148), तेजस सुर्यवंशी (146), वेदांत गायकवाड (146), जय गायकवाड (130), प्रतिक ढमढेरे (130) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संभाजी कांबळे, जनाबाई बनकर, विलास रासकर, सुनील शेळके, संतोष विधाटे, प्रेमाला मोहिते, अश्विनी ढमढेरे, कल्पना जगताप, व मनोज वाबळे यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय ढमढेरे, सरपंच ताई सोनावणे, ग्रामपंचायत सदस्य नीलम भुजबळ, नारायण शेवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय जेधे, उपाध्यक्ष सोनाली ढमढेरे, सदस्य जालिंदर आदक, सुरेखा भुजबळ, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे व पालकांनी यशस्वी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक विलास रासकर, सूत्रसंचालन सुनील शेळके व संतोष विधाटे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)