तळेगाव ढमढेरे येथे 21 जणांची मोफत शस्त्रक्रिया

तळेगाव ढमढेरे- येथील संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 356 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले तर 21 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत, जिवोदोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके होते.

डॉ. संदीप कासगुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास ढमढेरे, संचालक सुदीप गुंदेचा, तळेगाव ढमढेरेच्या सरपंच ताई सोनवणे, उपसरपंच विजय ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, श्रीकांत ढमढेरे, कैलास नरके, रवींद्र ढमढेरे, संदीप ढमढेरे, रमेश भुजबळ, आरपीआय तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, डॉ. संदीप कासगुडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश तोडकर, प्रमोद ढवळे, महेंद्र पिंगळे, अण्णा तोडकर, वसंत भुजबळ, दत्तात्रय भुजबळ आदी उपस्थित होते. विजय ढमढेरे यांनी प्रास्ताविक केले. गणेश तोडकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)