तळेगाव ढमढेरे येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात

तळेगाव ढमढेरे- येथील गावात अखिल महाराष्ट्र श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संघ, तळेगाव मंदिर येथे सर्व सुतार समाज बांधवांतर्फे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात कीर्तन, दिंडी सोहळा, प्रतिमा पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आणि त्यानंतर सुतार समाज संघटनेतील जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीमार्फत दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. सकळी 9 ते 11 दिंडी सोहळा पार पडला. दिंडीचे स्वागत गणपत बारवकर भाजप, ओबीसी सेल पुणे उपाध्यक्ष यांच्यातर्फे करण्यात आले. त्यानंतर कीर्तनकार हभप संतोष महाराज ताजणे यांचे प्रभू विश्वकर्मा महाराज यांच्यावरील कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, संचालक सुदीप गुंदेचा, शिरूर तालुका आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे, सामाजिक कार्येकर्ते बाळासाहेब लांडे, बसपाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कुदळे, तसेच इतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा आणि तालुका स्तरीय पांचाळ सुतार संघटनेच्या कार्यकारिणी सभासदांनी यावेळी भेट दिली. याप्रसंगी संभाजी भालेराव, आप्पासाहेब सोनावणे, जालिंदर सयाळ, महेश सुतार, संतोष इंगळे, अनिल सुतार, गणेश इंगळे, मारुती सुतार, रामचंद्र यशवते, राजेंद्र क्षीरसागर,योगिता चह्याळ, गोरख चह्याळ, संगीता भालेराव, मंदा शिंदे, तसेच इतर समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)