तळेगाव ढमढेरे परिसरात मुलींचीच बाजी

तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्‍यात अनेक शाळांमध्ये दहावीच्या माध्यमिक परीक्षेत मुलींनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यामध्ये तळेगाव ढमढेरे येथील ऋचा जयवंत भुजबळ हिला 99.60 गुण मिळाले, असून शैलेजा मोहन ओमासे हिला 95.80 गुण मिळाले आहेत, तर विठ्ठलवाडी येथील सुष्मा काशीकर हिला 93.60 टक्के गुण मिळाले आहेत.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भुजबळ विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.18 लागला असून, प्रथम क्रमांक ऋचा जयवंत भुजबळ (99.60) हिने पटकावला आहे, सोनाली सुरेश जाधव (96) गुण मिळवून द्वितीय आली आहे, तर स्वप्निल दशरथ सायकर (94) याने तिसरा क्रमांक मिळवला. चौथा क्रमांक हर्षदा विश्वास भुजबळ (92.20), आणि पाचवा क्रमांक ऋतुजा अरुण देव्हकर (89.60) हिने मिळवला आहे. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भुजबळ यांनी केले अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर. बी. गुजर शाळेचा दहावीचा निकाल 96.76 असा लागला आहे, प्रथम क्रमांक शैलेजा मोहन ओमासे (95.80) हिने मिळवला, तर द्वितीय सिद्धांत सुनिल कळमकर (95.40), नम्रता सुरेश सुतार (94.60), रितेश अरुण भुजबळ (94.40), पराग विजय क्षीरसागर (94.40), सिद्धार्थ सुनील कळमकर (94.20) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यश संपादित केलेल्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले अशी माहिती मुख्याध्यापक एम.एस.सातकर यांनी दिली.
विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयाचा निकाल 96.61 लागल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश थोरात यांनी दिली. या शाळेच्या सुषमा विठ्ठल काशीकर हिने (93.60) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर अनिषा दिलीप शिंदे हिने (90.60) टक्के गुण मिळवून द्वितीय आणि संकेत लोले याने (89.20) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गवारे सचिव हरिश्‍चंद्र गवारे यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

श्रीराम माध्यमिकचा शंभर टक्के निकाल
टाकळी भिमा (ता. शिरूर) येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय (ता. शिरूर) चा दहावीचा निकाल 100 टक्के लागला प्रथम क्रमांक रोहित यशवंत गायकवाड (88), द्वितीय क्रमांक आरती दत्तात्रय मोरे (82.80) आणि तृतीय क्रमांक वृषाली अशोक जाधव (81.80) असे अनुक्रमे पहिले तीन क्रमांक असून, या तीनही विद्यार्थाचेअभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुनिल वडघुले व संचालक मंडळ व सरपंच रवींद्र दोरगे यांनी केले अशी माहिती विदयालयाचे मुख्याध्यापक निलेश भुजबळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)