तळेगाव ढमढेरेत भगवान महावीर जयंती साजरी

तळेगाव ढमढेरे – येथील जैन धर्मीय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)येथे जुन्या काळातील जैन धर्मीय चिंतामणी पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. महावीर जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.29) मंदिरात सकाळी धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर सजवलेल्या चांदीच्या पालखीतून भगवान महावीर यांच्या मूर्तीची पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मुख्य बाजारपेठ, कारभारी चौक, कुंभार आळी अशी सवाद्य मिरवणूक काढली. यावेळी जैन बांधव आणि महिला मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभाग झाले होते. या मिरवणुकीची सांगता जैन मंदिरासमोर झाली. देवस्थान विश्वस्त समितीच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)