तळेगाव ढमढेरेत गौरींची मोठ्या उत्साहात स्थापना

शिक्रापूर -तळेगाव ढमढेरेसह (ता. शिरूर) परिसरात मोठ्या उत्साही वातावरणामध्ये तसेच मोठ्या थाटात गौरींची स्थापना झाली असून येथील संजय ढमढेरे व सुधीर ढमढेरे परिवाराने 80 वर्षांची परंपरा जपत मोठ्या थाटात व उत्साहात गौरींची स्थापना केली आहे.
गौरीने भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हा पासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया महालक्ष्मी गौरीची प्रतिष्ठापना करतात अशी यामागील हकीगत आहे, त्यापद्धतीने तळेगाव ढमढेरे येथील ज्येष्ठ चंद्रकांत बाबुराव ढमढेरे व लक्ष्मी चंद्रकांत ढमढेरे हे गेली 80 वर्षांपासून घरामध्ये मोठ्या थाटात गौरींची स्थापना करत राहिले; परंतु आता चंद्रकांत ढमढेरे हे वयोवृद्ध झाले असल्याने त्यांची मुले संजय व सुधीर हे त्यांचा वारसा जपत आजही गौरीची स्थापना करत असून तळेगाव ढमढेरे व परिसरामध्ये सर्वात मोठी गौरी स्थापनेचे कार्य ते करत आहे. यावेळी घरामध्ये लाडू, करंजी, पापडी यांसह आदी गोड पदार्थ ते बनवितात तसेच विविध प्रकारचे पदार्थ तसेच आदी साहित्यांची आरास ते या गौरीला देत असतात, आजही त्यांनी गौरीच्या या आरासमध्ये शंभरहून अधिक वस्तू मांडल्या आहेत व विशेष अशी सजावट केलेली आहे. त्यांनी गौरींच्या मूर्तीसाठी दागिने देखील तयार केलेले असून प्रत्येक वर्षी त्यामध्ये काहीना काही वाढ ते करत असतात. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडण्यासाठी संजय ढमढेरे, माधुरी ढमढेरे, सुधीर ढमढेरे, सुजाता ढमढेरे तसेच यांची मकरंद, शैल्यम, जुई व सई हि चारही मुले विशेष प्रयत्न करत असतात. गौरी विसर्जनाच्या दिवशीच ते गणपती विसर्जन करत असतात. तर संजय ढमढेरे व सुधीर ढमढेरे ही भावंडे येथील दुर्गा माता मंदिराची देखील देखभाल करत असतात व तळेगाव भागामध्ये सर्वात मोठी गौरी स्थापना करून समाजाला एक वेगळा संदेश देत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)