तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र कुंटे

वडगाव मावळ – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र पांडुरंग कुंटे यांनी नियुक्‍ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

बी. आर. पाटील यांची लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी बदली झाली. त्या रिक्‍त जागेवर शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुंटे यांची नियुक्‍ती करण्यात आली. निरीक्षक कुंटे हे अनुभवी गुन्हेगारांवर वचक ठेवणारे अधिकारी अशी ओळख आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अस्थायी कामगार असून, इंदोरी परिसरात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातच औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी तसेच परिसरातील अवैध धंद्यांवर वचक बसविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी नियुक्ती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक कुंटे म्हणाले की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून हद्दीतील गुन्हेगारी संपवण्यासाठी बेधडक कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)