तळेगाव उपविभाग वसुलीत अव्वलस्थानी!

तळेगाव दाभाडे : थकबाकी वसुलीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जनमित्राचा सत्कार करताना राजेंद्र पवार, प्रल्हाद खडके, मुकुंद तेलके.
  • विक्रमी वसुली : महावितरणकडून मावळातील जनमित्रांचा सत्कार

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तळेगाव दाभाडे उपविभागातील वीजग्राहकांकडे असलेली थकबाकी जनमित्रांनी विशेष मोहीम राबवून मार्च महिन्यात विक्रमी वसुली केली. या कामगिरीबद्दल सोमवारी (दि. 9) रोजी जनमित्रांचा सत्कार पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार होते. या वेळी कार्यकारी अभियंता प्रल्हाद खडके, तळेगाव दाभाडे उपविभाग अभियंता मुकुंद तेलके, उपअभियंता विजय जाधव व वीज कर्मचारी उपस्थित होते. तळेगाव दाभाडे उपविभाग कार्यालयांतर्गत तळेगाव शहर, तळेगाव स्टेशन क्र. 1, तळेगाव स्टेशन क्र. 2, इंदोरी, वडगाव मावळ, कामशेत, सोमाटणे व पवनानगर या आठ शाखा आहेत.

महाराष्ट्र राज्यात पुणे परिमंडळाची वीजग्राहकांकडून सुमारे 955 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करून राज्यात पुणे परिमंडलाचा प्रथम क्रमांक आला आहे. यात पुणे ग्रामीण मंडलाचा एकूण हिस्सा 225 कोटी रुपये आहे. या वसुलीमध्ये विभागीय, उपविभाग, मंडल आदी कार्यालयातील वायरमन, महिला विद्युत सहाय्यक, तसेच अधिकारी यांनी संपूर्ण मार्च महिन्यात सलग थकबाकी वसुलीचे काम करून विक्रमी वसुली केल्याबद्दल 125 वायरमन व महिला विद्युत सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाखा कार्यालयातील एक वायरमन व महिला विद्युत सहाय्यक यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळेगाव दाभाडे उपविभाग अभियंता मुकुंद तेलके यांनी केले. विजय जाधव यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)