तळेगाव दाभाडे – बंद घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे सोन्या-चांदीसह हिऱ्याचे दागिने व रोकड लंपास केली. तळेगाव येथील मधुबन सोसायटीमध्ये 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी अशोक रघुनाथ कोरे (वय 63, रा. पालघर) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथे वास्तव्यास असलेले अशोक कोरे हे एका नामांकीत कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. कोरे हे 18 ऑगस्ट रोजी ते कुटुंबियांसह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्या वेळी खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात घुसले आणि बेडरुममधील 14 किलो चांदी, 90 तोळे सोने, हिऱ्याचा हार आणि दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेली.

कोरे शनिवारी (दि. 1) सायंकाळी तळेगाव येथे आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्‍त नम्रता पाटील, सहायक आयुक्‍त श्रीधर जाधव, निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यासह सर्व अधिकारी, गुन्हे शाखा व अन्य शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)