तळेगावात बॅंकांकडून आर्थिक लूट

  • समस्या : एक हजार रुपयांमागे 10 रुपये आगाऊ घेतात

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मारुती मंदिर चौक येथे जनता सहकारी बॅंकेत चिल्लर 1, 2, 5 व 10 रुपयांचे नाणे असे एक हजार रुपये रक्कम भरल्यास 10 रुपये जास्त घेतले जातात. आधीच 10 रुपयांच्या नाण्यांना बंदीच्या अफवेने नागरीक 10 रुपयांचे नाणे बॅंकेत भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

शैलेश वहिले 10 रुपयांची 100 नाणी जनता सहकारी बॅंकेत भरण्यासाठी गेले असता त्यांना जास्त 10 रुपये द्यावे लागतील, असे सांगीतले. पत संस्थेचे बचत खाते धारकांचे दैनंदिन रक्‍कम ते जमा करतात. त्यात काही खातेधारक त्यांना 10 रुपयांचे नाणे देतात. त्याच्याकडे हजार ते दीड हजार रुपयांची चिल्लर जमा होते. ती रक्‍कम भरण्यासाठी सोमवार दि. 28 ला गेले असता त्यांना 10 रुपयांच्या 100 नाण्यांसाठी 10 रुपये जास्तीचे मागण्यात आले, असा आरबीआयनी नियम केला असल्याचे सांगण्यात आले.

आधीच 10 रुपयांच्या नाण्यांची बंद झाल्याच्या अफवेने नागरिक 10 रुपयांचे नाणे बॅंकेत भरण्यासाठी गर्दी करत आहे. त्यात त्यांचे नाणे बॅंकेत जमा करण्यासाठी आले असता बॅंकेकडून त्यांच्या नियमावलीनुसार हजाराच्या चिल्लरसाठी 10 रुपये जास्त असल्याचे सांगितले जात आहे. बॅंकेकडून होणारी नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्याची व 10 रुपयांच्या नाण्याचा आरबीआय नियम प्रथम दर्शनी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जनता सहकारी बॅंक लि. पुणेचे व्यवस्थापक राजन काळे म्हणाले, 1, 2, 5 व 10 रुपयांची नाण्यांत 1 हजार रुपये रक्कम भरल्यास 10 रुपये घेण्याचा 999 रुपये भरल्यास 10 रुपये घेतले जात नाही, असा आरबीआयचा नियम आहे. तसा नियम दाखवा म्हणल्यास त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)