तळेगावात “डॉल्बी’ वर पोलिसांची काठी!

तळेगाव-दाभाडे : पोलिसांनी जप्त केलेले डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टम्स.
  • पोलिसांची कारवाई : गणेशोत्सव मिरवणुकीत कर्णकर्कश “आवाज’ दाबला

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत बसवलेली डॉल्बी साऊंड सिस्टम्स तळेगाव स्टेशन चौकात पोलिसांनी अडवली. कर्णकर्कश आवाजावर शुक्रवार दि. 25 ला रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय हत्ते, विजय मारणे, प्रकाश वाघमारे, युवराज वाघमारे यांनी दोघांवर कारवाई केली. धामणे गाव हद्दीतही गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत संजय रामभाऊ तेलंग (रा. कान्हेवाडी, ता. खेड) व सौरभ देवराम सावंत (रा. गोडुंब्रे, ता. मावळ) यांच्यावर कारवाई केली. 55 डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे व डॉल्बी साऊंड वाजवणारावर पोलिसांची करडी नजर होती. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे करत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यावर्षी दहिहंडी उत्सवात डॉल्बी साऊंड सिस्टम्स वाजवलेल्या मंडळावर गुन्हा दाखल केला होता. यावर्षी गणेशोत्सवात डॉल्बी साऊंड सिस्टम्स वाजवलेल्यांवर गुन्हा दाखल केला. याचा धसका डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टम्स चालकांनी घेतला आहे.

पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील म्हणाले, यापुढेही कारवाई सुरु राहील. गणेशोत्सव शांततेत व आनंदात साजरा करा. सर्व गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू ठेवून संशयास्पद व्यक्‍ती व वस्तूंच्या हालचालींवर नजर ठेवून अनुचित प्रकार घडण्याच्या आधीच पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)