तळेगावात उन्नत शेती, समृद्ध शेती पंधरवडा कार्यक्रम सुरु

हुमणीच्या प्रादुर्भावबाबात शेतकऱ्यांना मार्गदर्शन : कृषी विभागाच्या योजनांची दिली माहिती

तळेगाव ढमढेरे – महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेती पंधरवडा अभियान सन 2018 ची सुरुवात आणि याचा उद्घाटन कार्यक्रम गुरूवारी (दि.24) मौजे तळेगाव ढमढेरे गावात झाला. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येतो. तो येण्यापूर्वी उपाययोजना करण्यासाठी अगोदरच काय उपाययोजना शेतकऱ्यांनी कराव्यात? याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान यांनी सात कलमी कार्यक्रम राबवण्याचे धोरण सुचवले आहे. उत्पादकता वाढवून जास्त उत्पादन घेणे, उत्पादन खर्च कमी करणे, खात्रीशीर उत्पन्न स्रोत, जोखीम व्यवस्थापन आणि शास्वत पद्धती, कृषी संलग्न कार्यक्रम, हरित मोहीम, प्रधानमंत्री किसान संपदा या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या. या कार्यक्रमासाठी आत्माचे प्रकल्प संचालक कुंडलिक कारखिले उपस्थित होते. या पंधरावड्याचा उद्देश आणि आत्मा योजनेअंतर्गत योजना सहलीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पुढील 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? तसेच सेंद्रिय शेती आणि ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्रज्ञ डॉ. हनुमंत घाडगे यांनी खरीप पीक पद्धती, सुधारित/प्रमाणित बियाणे वापर, बीजप्रक्रिया योग्य खत, पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन किडी रोग, जमिनीचे आरोग्य, जमिनीची निवड ह्याविषयी मार्गदर्शन केले. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यावेळी कीड नियंत्रण करणे फार अवघड असते. त्यासाठी त्याचे भुंगेरे वळवाच्या पावसानंतर बाहेर पडतात. यावेळी प्रकाश सापळे यांनी, सामुहिक शेतकऱ्यांनी शेतात लावणे, जमीन खोल नांगरट करून उन्हात तापू देणे. जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कधी करावा? ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शिक्रापूरचे मंडल कृषी अधिकारी वंसत बांगर यांनी, कृषी विभागाच्या विविध योजना, यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, सुक्ष्मसिंचन, मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे, कांदाचाळ, शेडनेट राष्ट्रीय पीक विमा इत्यादी योजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तसेच कृषी पर्यवेक्षक सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी केले. तर, अशोक गायकवाड यांचे सहकार्य लाभले. श्रीराम बचत गटाचे सचिव धनश्‍याम तोडकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)