तळेगावातून गाई-म्हशी पळविणाऱ्यांचा पर्दाफाश

  • दोघे ताब्यात : आणखी 10 जण फरार

शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे, पारोडी, माळवाडी (ता. शिरूर) या भागातून अनेक दिवसांपासून गाई म्हशींची चोरी होण्याचे प्रकार वाढत चालले होते. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असताना गाईसम्हशींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नुकतेच पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेलते असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी 10 जणांची नावे सांगितली आहेत. यातील 10 जण फरार आहेत.

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनच्या हद्‌द्‌तीतील तळेगाव ढमढेरे, पारोडी, माळवाडी या भागातून अनेक दिवसांपासून गाई आणि म्हशींची चोरी होत होती. काही दिवसांपूर्वी तळेगाव ढमढेरे भागातून हे प्रकार वाढत असताना 10 ते 15 गाई आणि म्हशी चोरीस गेल्या होत्या. अशाच प्रकारे 18 मार्च रोजी पारोडी येथून कविता बाळासाहेब टेमगिरे यांच्या गोठ्यातील 5 गाई आणि येथील गोठ्यातून दोन मोबाईल देखील चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचा तपास करणे शिक्रापूर पोलिसांपुढे आव्हान होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तळेगाव भागातून एक टेम्पो गाई आणि म्हशी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक राजू मोमीन, पोपट गायकवाड, नितीन गायकवाड, कोकरे यांना मिळाली.
त्यांनतर टेम्पो आणि आरोपींची चौकशी केली असता स्वामी चिंचोली (ता. दौंड) या भागामध्ये गाई-म्हशीची चोरी करणारी टोळी असल्याचे समजले. त्यानंतर या पथकाने मिळालेल्या माहितीवरून रामभाऊ नाना गुणवरे (वय 22), विशाल गणपत गुणवरे (वय 27, दोघेही राहणार स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी आणखी दहा साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचे सर्व साथीदार फरार झालेले आहेत. त्या सर्वांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठीडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीत आहेत.

  •  गायाचोरीमध्ये माजी सरपंचाच्या नावाची जोरदार चर्चा
    तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) भागातील गाई-म्हशी चोरीस जाण्याच्या घटना घडत असताना अचानक पोलिसांनी त्यातील कह9 आरोपींना अटक केली असून काही आरोपी फरार झाले आहेत परंतु फरार असलेल्या आरोपींमध्ये व आरोपींना साथ देणाऱ्यामध्ये पारोडी दहिवडी भागातील एका माजी सरपंचाचे नाव असून त्या माजी सरपंचाची स्वतःचे नाव वगळण्यासाठी जोरदार हालचाली सुरु असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)