तळेगावातील विद्यार्थ्यांना कॅनरा बॅंकेकडून शिष्यवृत्ती

तळेगाव ढमढेरे – स्व. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे येथील पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रांजणगाव येथील कॅनरा बॅंकेच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्व. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला येथील पाचवी ते दहावीच्या सहा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुमारे 22 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक महेश ढमढेरे, कॅनरा बॅंकेच्या रांजणगाव शाखेच्या व्यवस्थापक कोकिल शर्मा, बॅंकेच्या कृषी अधिकारी जयश्री कुमारी, कॅनरा बॅंक भिगवण शाखेचे व्यवस्थापक आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबराव गवळे, प्राचार्य माणिकराव सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, शिवाजी आढाव यांसह आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील मनस्वी साळवे इयत्ता पाचवी, जोत्सना लांडे इयत्ता सहावी, शुभांगी बनसोडे इयत्ता सातवी, प्रिया लांडे इयत्ता आठवी, निकिता सूर्यवंशी इयत्ता नववी आणि साक्षी शेलार इयत्ता दहावी यांना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबराव गवळे, कोकिल शर्मा आणि महेश ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी आढाव यांनी केले. तर पर्यवेक्षक राजाराम पुराणे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)