तळेगावच्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाला जंगली झाडांना वेढा

इंदोरी – तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाच्या भिंतीमध्ये व त्याच्या बोगद्याच्या दुतर्फा दाट जंगली झाडी वाढल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे सुमारे 120 वर्षांपूर्वीच्या पुलाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने त्याची तातडीने दखल न घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुलाच्या दुरुस्तीचे व झाडी तोडण्याची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी विशाल वीर प्रवाशांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई ते पुणे रेल्वेगाड्या आणि लोकल याच मार्गावरून धावतात. नवीन पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहनाची वाहतूक सुरू असते. जुना पूल व नवीन पुलामधील जागेत मातीच्या ढिगाऱ्यावर वाढलेली झाडी, दगड, माती लोहामार्हावर पडण्याचा धोका आहे. एरंड, पिंपळ व रान झाडी यांची पुलाच्या दगडामध्ये वाढ झाली आहे. झाडाची मुळे खोल रुजल्याने दगडामध्ये भेगा पडून त्यातून सतत पाणी झिरपत असते. खडकही ठिसूळ बनले आहेत.

सध्या तळेगाव, (ता. मावळ) परिसरात पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षी संततधार पावसामुळे पुलाजवळचा भराव कोसळला होता. रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली होती. या पार्श्‍वभूमीवर पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे.

तळेगाव येथील जुन्या रेल्वे पुलाच्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी लहान-मोठी झाडे वाढलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून हीच परिस्थिती कायम आहे. प्रवाशांच्या व पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता रेल्वे प्रशासनाने ही झाडी काढण्याची आवश्‍यकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)