तळेगावचे कृषिदूत देणार शिंगवेच्या शेतकऱ्यांना धडे

संग्रहित छायाचित्र...

पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्‍यातील शिंगवे येथे कृषी कार्यानुभवांतर्गत तळेगाव दाभाडे येथील वसंतदादा पाटील कृषी महाविद्यायातील कृषिदुतांचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

हे कृषिदूत शेतीशी निगडित विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत, यावेळी माती परिक्षणाचे महत्त्व सांगून, त्यासाठी मातीचे नमुने कसे गोळा करावेत याबद्दल आणि त्याचबरोबर भुईमूग वरील रोग टाळण्यासाठी बीज प्रक्रिया यावरील प्रात्यक्षिके घेतले. यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. हे कृषिदूत पुढील सहा महिने या गावात राहणार असून, ते शेतकऱ्यांना जनावरांचे लसीकरण, दुग्ध व्यवसाय, शिवार फेरी, सेंद्रिय बीजप्रक्रिया, सेंद्रिय त्याचबरोबर आधुनिक शेती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूत अक्षय फावडे, हर्षल मावळे, विकास पाटील, चिराग जगदाळे, विनायक जाधव, अंकुर रामटेके व जी. शिवाकुमार आदी सहभागी झालेले आहेत. सरपंच नूतन वाव्हळ, उपसरपंच चंद्रकांत वाव्हळ, किरण टाके, सुदाम गाढवे, नितीन वाव्हळ, बाळासाहेब वाव्हळ, सुदाम वाव्हळ हे उपस्थित होते. या कृषिदूतांना बी. व्ही. खोब्रागडे आणि एस. एस. निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)