तळेगावकर रसिकांना कलापिनी कलामंडळाची सुरेल भेट

तळेगाव दाभाडे  – येथे कलापिनी सांस्कृतिक केंद्रात दादा परांजपे आणि कमलिनी परांजपे स्मृती पुष्पांतर्गत “कजरा मोहबतवाला’ या जुन्या काळात घेऊन जाणारा सुरेल कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्टय म्हणजे हा कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व महिला होत्या. पुण्यातील “सूर सखी’ या संस्थेने सादर केलेला हा कार्यक्रम सहभागी महिलांचे गायन, वादन, निवेदन, संकल्पना यातले प्राविण्य थक्क करणारे होते. 1960 ते 1980 या दशकातील अवीट गोडीची महिला द्वंद गीते या कार्यक्रमात सादर केली.

सव्वा दोन तास सर्व रसिक तल्लीन झाले होते गाण्यांना भरभरून दाद देत होते व सतत “वन्स मोअर’ मिळत होते. अपलम…चपलम, मै चली मै चली.. अशी एका पेक्षा एक सरस द्वंद गीते सादर केली. गयिका मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन आणि देवयानी सहस्रबुद्धे यांच्या सुरेल आवाजाला शिल्पा आपटे (तबला, ढोलक), भावना टिकले (तबला), संपदा देशपांडे (संवादिनी), उमा जठार (व्हायोलीन), किमया काणे (सिंथेसायझर), स्वाती मेहंदळे (साईड रिदम, ताल वाद्य) यांनी तितकीच सुरेल साथ संगत केली. रंजना काळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या कार्यक्रमाची संकल्पना मानिनी गुर्जर व रंजना काळे यांची होती.

कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्‍वर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेतन पंडित, विशाखा बेके, आदित्य धामणकर, हृतिक पाटील, चैतन्य जोशी, रश्‍मी पांढरे, अशोक बकरे यांनी कलामंडळ प्रमुख संजय मालकर व चेतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)