तळेकरवाडीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

डिंभे – शुभांगी कोपरकर आणि परिवाराच्या वतीने आंबेगाव तालुक्‍यातील आदर्शगाव तळेकरवाडी येथील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. आदिवासी, अतिदुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणुन कोपरकर परिवारातर्फे मागील सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी तळेकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेकांची हालत नाजुक असल्यामुळे मुलांचे शिक्षण वह्यांअभावी अडू नये म्हणून वही भेट योजना सुरु केली होती. आपण किमान एक वही भेट द्यावी अशी विनंती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन केली व या वही भेट योजनेत त्यांच्याकडे 32,500 वह्या जमा झाल्या आहेत. यावेळी तळेकरवाडीचे सरपंच सुरेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत तळेकर, संतोष खालकर, ग्रामपंचात सदस्य अमित तळेकर, सुनंदा तळेकर, नंदा रेवडकर, कविता कोपरकर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)