तळशेत ठाकरवाडीकरांची चिखलापासून मुक्‍तता

भामा आसखेड- करंजविहीरे (ता. खेड) तळशेत ठाकरवाडी येथे येण्यासाठी सार्वजनिक रस्ता नव्हता. तर पावसाळ्यात कायम चिखलच असायचा, त्यामुळे नागरिकांना चिखल तुडवतच ये-जा करावी लागत असे, हीच नागरिकांची समस्या दूर होण्यासाठी या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने, नागरिकांची चिखलापासून मुक्‍तता झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, शिकलेल्या आणि पुढारलेल्या माणसांपेक्षा अशिक्षीत आणि साधी माणसे फार समजदार असतात. अनेक गावात अंतर्गत रस्ते करताना लोक आडवे येतात. त्यामुळे शासकीय निधी परत जातो. पण तळशेत येथील ठाकर बांधव मात्र, याबाबत अपवाद आहेत. भूमीपूजन करताना नीट उभे राहण्यासाठी जागा नव्हती. ठाकर बंधु-भगिनींनी काम सुरू करण्याआधी रस्ता मोठा करू म्हटंल्यावर स्वतःहून रस्त्याला अडसर ठरणारी आपली सपर, पडव्या काढून घेतल्या. सिमेंट कॉंक्रिटीकरण करतानामध्ये जागेची अडचण आल्याने पंप व पाइपद्वारे मटेरियल न्यावे लागले. याकामास येथील नागरकांनी सहकार्य केल्याचा चांगला अनुभव आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्षात उर्वरीत कॉंक्रिटीकरण करावयाचे असून याठिकाणी एक पत्र्याचे शेड करून देणार आहे. जेणेकरून घरापुढे लग्न करताना या ठाकर मंडळींनी त्यांचा उपयोग होईल आणि इतरवेळी त्यांना वापरायलाही जागा होईल. याकरीता करंजविहिरेच्या सरपंच उज्वला खेंगले, उपसरपंच कैलास बोराङे,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, रामदास कोळेकर, श्रीपती कोळेकर, रमेश कोळेकर, गणपत कोळेकर यांनी विशेष सहकार्य केले, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)