तळवडी चौकात बसवले पथदिवे

उरुळी कांचन- येथील तळवाडी चौक अपघाताचे केंद्र बनला होता. अनेक वेळा रात्री येथे अंधार असल्याने अपघात वाढले होते. मात्र, या ठिकाणी आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पथदिवे बसवले जात असल्याने अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे सोलापूर महामार्ग उरुळी कांचन गावातील तळवाडी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने एलाईट चौक ते सोनाई हॉटेल या हद्दीत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुमारे 20 लक्ष रुपये खर्चातून पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, हे दिवे इरिगेशन कॉलनीपर्यंत बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत उरुळी कांचन येथील ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी सांगितले की, उरुळी कांचन इरिगेशन कॉलनी ते चौधरी वस्तीपर्यंत पथदिवे बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दिव्यांमुळे पुढे गाव आहे, हे वाहन चालकांच्या लक्षात येणार असून, अपघाताचे प्रमाणात कमी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)