तळमाची वाडीत दुष्काळग्रस्तांना दिलासा

ओतूर- तळमाची वाडी (ता. जुन्नर) येथे चैतन्य श्वास ग्रुप ओतूरच्या वतीने येथील नागरिकांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी पाण्याच्या टाक्‍या बांधून दिल्या असून, यामुळे ऐन दुष्काळात येथील लोकांना पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे. ओतूर (ता. जुन्नर) च्या शाळेची 1990 ची ही बॅच हॉट्‌स अप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आली आणि त्यानंतर या माध्यमाने समाजपयोगी कामे करण्याचे ठरले. जुन्नर तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील तळमाची वाडीची यासाठी निवड करून त्यांनी या ठिकाणी विहिरीवर मोटार बसबून पाइपलाइन करून वाडीतील शाळेत पाण्याची एक टाकी, तसेच वाडीत दोन पाण्याच्या टाक्‍या बसवल्या असून, नागरिकांच्या घराजवळ पाणी आणले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा ताजवे यांनी केले तर आभार चंदकांत भालेराव यांनी मानले. चैतन्य श्वास ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र ढमाले, उपाध्यक्ष प्रेरणा तांबे, सचिव विष्णू साबळे, खजिनदार चंद्रकांत भालेराव, संदेश पानसरे, दीपक सुकाळे, खंडु डुंबरे, दिनेश ढमाले, सुरेखा ताजवे, सुरेखा गाढवे, अस्मिता पोखरकर, उज्ज्वला चव्हाण, संतोष पानसरे, संदीप थोरात, अशोक अहिनवे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)