तळपत्या उन्हामुळे बाजारपेठा “थंडावल्या’

उरुळी कांचन- उरुळी कांचन येथे दर रविवारी आठवडे बाजारात भरतो. या बाजारात परिसरातील 10 ते 12 गावांतील शेतकरी आणि नागरिक भाजीपाला खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. मात्र सध्या या भागातील तापमानात प्रचंड वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम आठवडे बाजारावही दिसून आला. बाजारपेठेत दुपारच्या वेळीस बाजारपेठेतील उलाढाली थंडावल्या होत्या, तर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड गर्दी असणारी रसवंतीगृहे देखील ओस पडली होती.
उरुळी कांचन हे हवेली तालुक्‍यातील दौंड आणि पुरंदर तालुक्‍यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. या तीनही तालुक्‍यांतून या ठिकाणी रविवारी आठवडे बाजारच्या निमित्ताने सकाळपासूनच धान्य आणि भाजीपाल्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, अलीकडच्या दिवसांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तर तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास गेले असल्याने त्याचा परिणाम रविवार भरणाऱ्या या बाजारावरही दिसून आला. सकाळी 10 वाजता बाजार सुरू होतो; पण तीव्र उन्हामुळे रविवारी कोणीही घराबाहेर पडायला तयार नव्हते, त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाली थंडावल्या होत्या. संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.सकाळी 11 ते दुपारी साधारण 5 वाजेपर्यंत व्यापारी मालाकडे नुसते पाहत बसले होते.
याबाबत येथील किरकोळ मालाचे व्यापारी महादेव सावंत आणि दत्तात्रय रायकर यांनी सांगितले की, सध्या लग्नसराई आहे, त्यामुळे खरे तर भाजी-पाल्याला चांगली मागणी असते; पण उन्हामुळे बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे लक्षात येत आहे. दुपारी साधारण चारनंतर बाजारपेठेत थोडी हालचाल जाणवली. उन्हे उतरल्यावर काही नागरिक बाजारहाट करण्यासाठी येथे आल्याचे दिसून आले.

  • ंऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शीतपेयांना चांगली मागणी असते. रसवंती गृहात दुपारच्या वेळी गर्दी होते; मात्र रविवारी या ठिकाणी देखील उन्हाचा चांगलाच परिणाम जाणवला. उन्हामुळे नागरिक घराबाहेरच पडले नसल्याने गुऱ्हाळे देखील ओस पडली.
    – शांताराम महाडिक, रसवंती गृहाचे मालक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)