तलाव पार करणारी “झिप लाईन’ ठरली आकर्षण

साईबन पर्यटन स्थळ ;  डॉ. कांकरिया दांपत्याला 25 वर्षापुर्वी पडलेलं हिरवं स्वप्न

नगर: दोन डोंगर किंवा नदी पार करण्यासाठी वापर केली जाणारी व मोजक्‍या पर्यटनस्थळी असणारी झिप लाईन सफर साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये सुरु करण्यात आली असून नाताळाच्या सुट्टीचे ते मुलांचे व येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे साईबन मधील तलाव पार करणारी झिपलाईन सफर जिल्हात प्रथम सुरु झाली आहे
टेकडी वरून तलाव पार करण्यासाठी झिपलाइन बनविण्यात आली आहे. या लाइनवरून पर्यटक तलाव पार करून दुसऱ्या टोकाला असलेल्या किनाऱ्यावर जातात. वेगाने हा प्रवास होतो. त्यासाठी नैसर्गिक उतार वापरण्यात आला असून सुमारे 500 किलो वजन पेलण्याची त्यामध्ये क्षमता आहे. ज्यावेळी पर्यटक डोंगरावरून झिप लाइनने निघतात त्यावेळी आपण हवेत तरंगत आहोत असे वाटते सर्व परिसर सुंदर दिसतो, खाली दिसणाऱ्या बोटी, तलावाचा कारंजाच्या तुषार अंगावर घेत पर्यटक थेट हुरडा पार्टीच्या ठिकाणी पोहचतो,नगरकर तर खास या ठिकाणी येत आहेत व झिपलाईनचा आनंद घेत आहे. सध्या सुट्यांच्या दिवसात या जिपलाइनवरून असंख्य लोक आनंद घेत आहे. यामुळे आठ लोकांना रोजगार पण मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया यांनी 25 वर्षांपूर्वी नगर-शिर्डी रस्त्यावर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागे 150 एकरांच्या माळरानावर हिरव्यागार वनराईचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्यास सुरूवात केली. याकरिता त्यांनी आंबा, चिंच, कडुनिंब, निलगिरी, बाभूळ, साग, बांबू,बोर, आवळा, सीताफळ, करवंद अशा झाडांची लागवड केली. औद्योगिक प्रकल्पाचे वाया जाणारे सांडपाणी मोठ्या कुशलतेने ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना दिले आणि पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविला.

यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांनी मागील दहा वर्षांपासून कृषी पर्यटन सुरु केले आहे साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये अंतराळ सफर, सी वर्ल्ड, आयुर्वेदिय उद्यान, रोपवाटिका, पाणी अडवा, पाणी जिरवा मॉडेल व प्रदर्शनी, नक्षत्र उद्यान, भारतातील अभयारण्यांची माहिती, अपारंपारिक ऊर्जा, वाइल्ड लाइफ फोटोचे प्रदर्शन, जगातील नवीन-जुनी सात आश्‍ऐचर्ये आदी दालने विकसित केली असून पर्यटकांसाठी तलाव, बोटिंग, उंटगाडी, घसरगुंड्या, झोके, पपेट-शो अशा बऱ्याच गोष्टी विरंगुळा म्हणून उपलब्ध आहेत. हिवाळ्यातील हुरडा पार्टीची धमालही काही वेगळीच असते. सहकुटुंब एक अख्खा दिवस निसर्गाच्या सानिध्यात कधी जातो हे समजत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)