तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी किशोर शेंडे

सरचिटणीसपदी चंद्रकांत जाधव यांची निवड

शिरवळ – खंडाळा तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर शेंडे यांची तर कार्याध्यक्षपदी किशोर खटावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बाबर, खजिनदारपदी रुपाली यादव, सरचिटणीसपदी चंद्रकांत जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

खंडाळा येथे सातारा जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी सातारा जिल्हा तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष व सल्लागार निवृत्त नायब तहसीलदार सुरेश बामणे उपस्थित होते.

संघटनेच्या सहचिटणीसपदी शिवलीला थोरात, सल्लागारपदी शिरवळ मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके, निमंत्रित सदस्यपदी तलाठी निवृत्ती खेताडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष जोतिराम दगडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खंडाळा मंडलाधिकारी शिवाजी मरभळ, वाठार कॉलनी मंडलाधिकारी बाळकृष्ण लावंड, लोणंद मंडलाधिकारी विजय बोबडे, शिरवळ तलाठी अजित घाडगे, धनाजी साळुंखे, निशांत जोशी, मनीषा शिंदे, मनीषा जाधव, प्रियांका जाधव, आरती दळवी, प्रकाश किर्वे, विश्वास घुगे, श्रीकांत इटलोड, सागर शिंदे, प्रवीण मदने, तात्यासो गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार चंद्रकांत पारवे, सुरेश बामणे यांच्या हस्ते करण्यात आला. जितेंद्र कोंडके, शिवाजी मरभळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार वैभव पवार, अनिता साळी, रवी कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)