तलाकविरोधात नव्याने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली- “तिहेरी तलाक’, “निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्वाला घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या नवीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकांमध्ये उपस्थित मुद्दयांचे समाधान सध्या न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान होईल. त्यामुळे या संदर्भातील आणखी याचिका दाखल करून घेण्याची आवश्‍यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

“अहसान तलाक’, “हसन तलाक’ आणि “तलाक उल बिद्दत’ हे प्रकार स्वैर, अनियंत्रित, लहरी आणि मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे असल्याचा दावा गुरुदास मित्रा नावाच्या व्यक्‍तीने एका याचिकेद्वारे केला होता. त्यावरील सुनावणीला नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्‍त केले. आक्षेप घेण्यात आलेले तलाकचे प्रकार सर्वमान्य नाहीत, “खुला’ आंओ “मुबारत’ या दोन पद्धतींनाच मुस्लिमांमध्ये विशेष मान्यता असल्याचे वरिष्ठ विधीज्ञ सौम्या चक्रबर्ती यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे “तलाक’विषयी सुनावणी सुरु असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)