तलवार दाम्पत्याच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका सुनावणीला घेणार

आरूषी तलवार प्रकरण


सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली – आपली कन्या आरूषी तलवार आणि घरचा नोकर हेमराज यांच्या हत्या प्रकरणात राजेश आणि नुपुर यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश आणि नुपुर यांची आरूषी व हेमराज यांच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सीबीआयने आणि हेमराजच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ती आज न्या रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दाखल करून घेतली. सन 2008 साली झालेले हे हत्याकांड संपुर्ण देशभर गाजले आहे.

-Ads-

तलवार दाम्पत्य हे दंतवैद्यक दाम्पत्य आहे. त्यांच्या नॉयडा येथील घरात मे 2008 मध्ये त्यांची कन्या आरूषी व हेमराज हे मयत आढळून आले होते. त्या दोघांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात गाझीयाबादच्या कोर्टाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होंती पण अपिलात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. या दोघांची हत्या तलवार दाम्पत्यानेच केल्याच्या आरोपावर सीबीआय ठाम असून या प्रकरणात आपण सादर केलेले पुरावे भक्कम असल्याचा सीबीआयचा दावा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)