…तर हिंदू असहिष्णू होतील 

उमा भारती; राममंदिर उभारणीस विरोध अयोग्य 

लखनौ: हिंदू हा जगातील सर्वात जास्त सहिष्णू समाज आहे. माझी सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, त्यांनी अयोध्येत राम जन्मभूमीवर मशीद बांधण्याची चर्चा करत हिंदूंना असहिष्णू करण्याचा प्रयत्न करू नये, असे भाजपा नेत्या उमा भारती यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या म्हणाल्या की, अयोध्येत राम जन्मभूमीवर मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील. उमा भारती यांनी मंदिराच्या पायाभरणीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित केलं आहे. असं केल्याने त्यांच्या पक्षाला पापांचं प्रायश्‍चित करण्याची संधी मिळेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा असून समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह, ममता बॅनर्जी, मायावती आणि डाव्या पक्षांनीही या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं पाहिजे, असं मत उमा भारती यांनी व्यक्‍त केलं आहे. कॉंग्रेस श्रद्धेच्या मुद्द्यावर देशाचं विभाजन कऱण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मक्का, मदिना आणि व्हॅटकिन सिटीमध्ये मंदिर उभारलं जाऊ शकत नाही. तर मग अयोध्येत मशीद कशी काय बांधली जाऊ शकते. त्या म्हणाल्या की, मुद्दा केव्हाच सुटण्याची गरज होती. मात्र विरोधी पक्ष याकडे केवळ राजकारण म्हणून पाहता आहेत, त्यामुळे हा मुद्दा रेंगाळला असल्याचे त्या म्हणाल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)