… तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवा – हार्दिक पटेल

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या ठेवल्यानंतर भाजप नेत्यांनीही अन्य काही शहरांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. या मुद्यावरून पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नामांतराने जर देशाची प्रगती होत असेल तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवायला पाहिजे, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी भाजपवर निशाणा साधला.

-Ads-

हार्दिक पटेल म्हणाले कि, नामांतराने जर देशाची प्रगती होत असेल तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवायला पाहिजे. या देशात बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. आणि हे नाव आणि मूर्तींमध्ये अडकले आहेत. ते पुढे म्हणाले कि, राम मंदिर भाजपचा निडणुकीती वोट बँकेचा मुद्दा आहे. सीबीआय वाद, राफेल करार, आरबीआय आणि बेरोजगारी सारख्या मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठी भाजप राम मंदिराचा मुद्दा समोर करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)