…तर शिवसेनेचे नेते ममता बॅनर्जी यांना का भेटू शकत नाही? : सेनेकडून भेटीचे समर्थन

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशतील दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समावेश होता. दरम्यान, या भेटीवरून सेनेवर सर्वच स्तरातून टीका झाली होती. याच टीकेला आज सेनेने उत्तर आणि भेटीला समर्थन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटू शकतात. तर शिवसेनेचे नेते ममता बॅनर्जी यांना का भेटू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करीत खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या भेटीचे समर्थन केले आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत-ममता बॅनर्जी यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना भेटतात. ममता बॅनर्जी या तर आपल्याच देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी या कधीकाळी ‘एनडीए’तील घटक पक्ष राहिलेल्या आहेत. त्या कोणी बहिष्कृत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)