…तर शासनानेच दुध खरेदी करावे

शरद पवार यांच्या समवेत बैठक : दुध उत्पादक, प्रक्रीया व्यावसायिकांची भुमिका

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.24 – आम्ही ठरवून दिलेल्या दरानेच दुध खरेदी करण्यात यावी, अशी सक्ती राज्य शासनाकडून होत असेल तर त्यांनीच शेतकऱ्यांकडून दुध खरेदी करावे अशी भुमिका दुध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणकारी संघाकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली. माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात सध्या दुध दराचा प्रश्‍न बिकट बनला आहे. दुध उत्पादकांनी दुधाला दर मिळावा म्हणून आंदोलन सुरू केले आहे तर दुसरीकडे दुध व्यावसायिकांनी ऐवढा दर देणे शक्‍य नसल्याचे सांगत शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे. या दोन्हीतून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यात यावा या हेतूने राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते व माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. त्यासंदर्भात गुरुवारी बारामती येथे बैठक झाली. या बैठकीत शासनानेच दुध खरेदी करावे अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ आदी उपस्थित होते.

यावेळी गोपाळराव म्हस्के म्हणाले, शरद पवार यांनी आमचे म्हणणे ऐकून घेत दुधाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपन मुख्यमंत्र्यांना भेटायला येण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना 27 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची भुमिका आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता दुध व्यावसायिक अडचणीत आले आहेत.दुधाला मागणी कमी झाली आहे. दुध संघांना सुद्धा 27 रुपये दर देणे शक्‍य नाही. काही वर्षापूर्वी दुध पावडरला चांगली मागणी होती. त्यावेळी आम्ही स्वत:हून शेतकऱ्यांना जादा दराने पैसे दिले आहेत. मात्र, आता ते शक्‍य नाही. शासनातर्फे दुध दराच्या सक्तीबाबत शरद पवार यांनी सुद्धा नापसंती दर्शविली, राज्य शासन अशाप्रकारे 27 रुपये दर देण्याबाबत नोटिस काढू शकत नाही. आम्हाला सुद्धा संघ चालवायचा असतो. जर शासन नोटिस काढून कारवाई करणार असेल तर मग शासनानेच शेतकऱ्याकडून सगळे दुध खरेदी करावे. सध्या फक्त एक टक्का दुध शासन खरेदी करत आहे. शासनाने खरेदी केलेले दुध त्यानीच ठरवावे कोणाला द्यावे ज्याप्रमाणे पंजाब, हरयाणामध्ये राज्य शासनच शेतकऱ्यांचा गहू खरेदी करतो त्याप्रमाणे महाराष्ट्रात धोरण राबवावे, असे शरद पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

दुध प्रश्‍नावरुन होणारी आंदोलने चिघळूु नयेत तसेच यातून मध्यम मार्ग काढता यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला.या शिष्टमंडळाचे नेतृत्व शरद पवार यांनी करण्याचे निश्‍चित झाले आहे.त्यानुसार येत्या 28 किंवा 29 मे रोजी ही भेट होणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून भेटीची वेळ निश्‍चित करण्यात येईल त्यानंतर शिष्टमंडळ मुबंई भेट घेईल असे ही म्हस्के यांनी सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)