…तर शहर देशात प्रथम राहील!

महापौर नितीन काळजे : घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

पिंपरी – कचऱ्याची समस्या सर्वत्र असून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कचऱ्याच्या विलगीकरणासह पुन:वापर करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य केल्यास आपले शहर देशात प्रथम क्रमांकाचे होईल, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

-Ads-

ऑटो क्‍लस्टर, चिंचवड येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग कार्यालय व आरोग्य विभाग आणि शहरातल्या विविध संस्था व संघटना यांच्या करीता घेण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी महापौर बोलत होते. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता अयुब खान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, स्मिता झगडे, आशा राऊत, ग्राहक पंचायतीचे रमेश सरदेसाई, रस्ते व्यवस्थापनाचे आय. एम. मर्चंट, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, मागील दशकामध्ये शहराची वाढ 70 टक्के झाली असून भविष्यातही ती सातत्याने राहणार आहे. विकास आराखड्याप्रमाणे ठरविण्यात आलेली विकासाची दिशा यामुळे या शहराकडे येणारा नागरिक आकर्षित झालेला आहे. नागरीकरण ही समस्या म्हणून न पाहता कामकाजाची संधी म्हणून पहावे लागणार आहे. व येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शहराच्या विकासासाठी नियोजनबध्द काम केल्यास विकासाबाबत अडचणी निर्माण होणार नाही. शहराची झपाट्याने वाढ होत असल्याने दरवर्षाला 5 टक्के कचरा वाढणार आहे. यावर उपाय म्हणून कचऱ्याचे विलगीकरण जागच्या जागी झाले पाहिजे. विलगीकरणानंतर त्यांचे मुल्य वाढते व विल्हेवाट व्यवस्थित केल्यास कचऱ्याबाबतच्या समस्या सोडविणे सुलभ होईल असेही ते यावेळी म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)