…तर राज ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर जाहीर चर्चा करण्याची तयारी -नितीन गडकरी

* राज्यातील रस्ते विकास कामांची यादी ‘कृष्णकुंज’वर 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गडकरींनी उत्तर दिले आहे.  राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणात केलेल्या टीकेमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक विकास आणि पाणीपुरवठा मंत्री नितीन गडकरी नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर एक यादीच  पाठवली आहे. राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची ही यादी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुमारे पाच लाख कोटींची कामे सुरु झाल्याचा दावा यात गडकरींनी आपल्या पत्रात केला आहे. त्यापैंकी चार लाख २७ कोटींच्या कामांची ही यादी आहे. राज ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मी पाठवलेल्या कामांच्या यादीबद्दल शंका असल्यास शिवाजी पार्कवर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे सांगत गडकरींनी आपल्या पत्रात राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी गडकरींच्या रस्ते विकास कामांच्या घोषणांची ‘साबणाचे बुडबुडे’ म्हणत खिल्ली उडवली होती. रविवारी झालेल्या या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी गडकरी यांनी कृष्णकुंजवर ही यादी धाडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)