… तर यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही रहाल फिट

वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. यातच अपचन होते, यामुळे अनेक जण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. परंतु, तुम्ही जर संतुलित आहार आणि योग्य काळजी घेतली तर यापासून सुटका करू शकता. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला खास तुमच्यासाठी….

उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून अधिक घाम येत असल्यामुळे ‘इलेक्‍ट्रोलाइट’ असंतुलित होतो. उन्हाळ्यात अधिक उष्ण आहाचे सेवन करणे टाळावे. कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना स्वत:ची रोगप्रतिकार क्षमताही वाढवण्याची गरज असते. यासाठी, शक्‍यतो न्याहारीत दूध, फ्रूटशेक, ज्यूस, फळे, कडधान्य, ओटस्‌, पोहे इत्यादी पदार्थ असावेत. तर दुपारी जेवताना विविध डालींचा समावेश असावा. हिरव्या पानांच्या भाज्या, दोन-तीन चपात्या आणि भरपूर सलाडचा समावेश करा.

रात्री जेवताना जड आणि गरजेपेक्षा जास्त जेवण टाळा. रात्रीच्या जेवणात रस्सेदार भाज्या, दोन चपात्या आणि सलाड घ्या. चपात्या खायच्या नसतील तर तुम्ही खिचडीही खाऊ शकता.

हे अवश्‍य घ्या

टरबूज, खरबूज, काकडी अशी सिझनल फळे खा
पाणीदार खाद्य पदार्थ घ्या
भोजनादरम्यान मोठा गॅप असू नये
अपचणाचा त्रास जाणवत असल्यास लिंबू पाणी आणि पुदीना पाणी प्या
जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं प्या
बाजारातील पेयपदार्थांऐवजी दही, ताक, लस्सी, नारळ पाणी अशा पदार्थांना प्राधान्य द्या

हे नककी टाळा

तळलेले पदार्थ टाळा
लंचचा टिफीन पाच ते सहा तासात खा. कारण, जास्त वेळ पॅक राहिल्यामुळे यामध्ये बॅक्‍टेरिया तयार होऊ शकतात.
चहा आणि गरम कॉफीपासून दूर राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)