…तर मी शपथ घेतली नसती – पी चिदंबरम

नवी दिल्ली : कर्नाटकात राज्यपाल विजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले असून, आज येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने येडियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

‘जर मी येडियुरप्पा असतो तर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असं चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बुधवारी भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काही वेळातच काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या मिळून ११६ जागा असून, भाजपाकडे १०४ जागा आहेत. ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यासाठी आणखी सात ते आठ आमदारांची गरज आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)