….तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार – कुमारस्वामी 

नवी दिल्ली – कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या महाआघाडी संकटात सापडली आहे. दोन्ही पक्षांमधील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. सिद्धरामय्यांच्या समर्थकांनी त्यांना आपला मुख्यमंत्री असे म्हंटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आपली नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. काँग्रेस आमदार आपली सीमा पार करत असून असेच चालत राहिले तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हंटले आहे.

कुमारस्वामी म्हणाले कि,  काँग्रेसच्या नेतृत्वाला या सर्व मुद्द्यांकडे पहावे लागेल. जर त्यांना हेच सुरु ठेवायचे असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. ते मर्यादा ओलांडत आहेत, काँग्रेस नेत्यांना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी म्हंटले कि, सिद्धरामय्या हे सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री राहिले आहेत. आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपले मत मांडले, यामध्ये चुकीचे काय आहे. आम्ही कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री असण्याने खुश आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)