….तर माझ्या परिवाराला कोणी मारले ?- कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल

अहमदाबाद: नरोडा पाटिया दंगलप्रकरणी अहमदाबाद उच्च न्यायालयाने भाजपच्या नेत्या आणि गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर या घटनेतील एक पीडित महिला समोर आली असून जर कोडनानी निर्दोष असेलतर माझ्या परिवाराला कोणी मारले ? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

अहमदाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर गुजरातमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यात या दंगलीमध्ये एका कुटुंबातील ८ लोक ठार झाले होते. त्या कुटुंबातील एक महिला समोर आली आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी, माझ्या डोळ्यासमोर एका पाठोपाठ ८ माझ्या कुटुंबातील लोकांना ठार करण्यात आले होते. जर या प्रकरणात माया कोडनानी निर्दोष असेल तर माझ्या परिवाराला कोणी मारले असा संतप्त सवाल यावेळी महिलेने उपस्थित केला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर गुजरातमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. नरोडा पाटिया दंगलीत तब्बल ९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३३ लोक गंभीर जखमी झाले होते. तसेच या प्रकरणी  हरीश छारा आणि सुरेश लंगडा यांना दोषी ठरवण्यात आले होते तसेच ३१ लोकांमधून १७ जणांची सुटका करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)