…तर महिलांना ३३ टक्के आरक्षण ! -सुप्रिया सुळे

File photo

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित दर्शवली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसमोरील संकटांबाबत प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. याशिवाय बेरोजगारी दूर करण्याबाबतही तरतूद करावी असे सुचविले.

तसेच, सर्वात महत्वाचे म्हणजे आगामी आधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक आणून त्यावर चर्चा करुन ते मंजूर करावे अशी मागणी केली. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)