तर मला फासावर लटकवा…

मुंबई – माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कामकाजाचा मुद्दा उपस्थित करत नियमावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आता आपण कामकाजात पुढे गेलो असून नियम 293 ची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर काही आक्षेप असेल तर वळसे-पाटील यांना बोलता येईल, पण आता प्रस्ताव संमत झाला आहे. त्याबद्दल कसे काय बोलता येईल असे स्पष्ट केले.

तेव्हा, वळसे-पाटील यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. मी चुकीचे बोलत असेन तर मला फासावर लटकवा. या सभागृहात काही नियम, कायदे आहेत कि नाही, असे ते म्हणाले. मला बोलण्याची परवानगी दिली असताना सत्ताधाऱ्यांकडून व्यत्यय आणला जात आहे. मला संरक्षण द्या, अशी त्यांनी मागणी केली. परंतु, सभागृहातील गोंधळातच विधेयके मंजूर करत तालिकाअध्यक्ष सुभाष साबणे यांनी कामकाज दिवसभराकरिता तहकूब केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)