…तर मंत्रालयात आम्हीही आत्महत्या करू! ओला-उबेर चालकांची मंत्रालयावर धडक 

मुंबई: खासगी ओला-उबेर टॅक्‍सी चालक-मालकांमध्ये सुरु असलेल्या वादाने आज उग्र रूप धारण केले. या खासगी टॅक्‍सी चालकांनी आज मंत्रालयावर आपल्या गाड्या घेऊन थेट मंत्रालयावर धडक दिली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसांत हस्तक्षेप केला नाही तर आम्ही मंत्रालयात आत्महत्या करू, असा इशारा आंदोलनकत्र्या चालकांनी दिला आहे. चालकांच्या या आंदोलनामुळे पोलीसांची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने आंदोलकांची धरपकड केली.

ओला-उबेर टॅक्‍सी चालकांनी आपल्या मागण्यांबाबत गेल्या दोन आठवड्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. गुरूवारी या चालकांनी दलित युथ पॅंथरचे अध्यक्ष भाईसाहेब जाधव व सचिव निलेश मोहिते यांच्या नेतृतवाखाली ओला-उबेर चालकांनी गुरूवारी संध्याकाळी मंत्रालयावर धडक दिली. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येउन त्यांनी आंदोलन केले. ओला आणि उबेरचे व्यवस्थापनासोबतही चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाने अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. राज्य सरकारकडेही त्यांनी चर्चेसाठी वेळ मागितला होता. मात्र परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप यावेळी चालकांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने जर दोन दिवसांत आमच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर शेतकरी ज्या प्रमाणे महाराष्ट्रात आत्महत्या करतोय त्याप्रमाणे ओला-उबेरचालकही मंत्रालयात येउन आत्महत्या करतील असा इशारा यावेळी भाईसाहेब जाधव व निलेश मोहिते यांनी यावेळी दिला. पोलिसांनी तातडीने आंदोलनकत्र्यांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)