…तर भारताला मिळू शकते ऑलम्पिकचे यजमानपद; प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : २०२६ युवा ऑलम्पिक आणि २०३२ मुख्य ऑलम्पिकचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेआहेत. त्याचबरोबर २०३० सालचे आशिया खेळाचे यजमान पद मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघात बोली लावण्याच्या तयारीत भारत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष थॉमस बॅच हे सध्या भारत भेटीला आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. बॅच यांनी भारतीय ऑलम्पिक संघाच्या या पुढाकाराची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर यासाठी जेव्हा बोली लावली जाईल त्यात भारताबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

-Ads-

सध्या यजमानपदासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. २०२६ साली होणाऱ्या युवा ऑलम्पिकच्या बोलीची प्रक्रिया २०२० च्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)