…तर भारतात यादवी माजेल, रक्तपात होईल – ममतांचा इशारा

नवी दिल्ली – आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेतून (एनआरसी) 40 लाख लोकांना वगळण्यात आल्याने भारतात यादवी माजेल आणि रक्तपात होईल, असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.
एनआरसी यादीच्या मसुद्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बहुतांश विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

त्या मुद्‌द्‌याचे पडसाद संसदेतही उमटले. त्यानंतर ममतांनीही आक्रमक पवित्रा स्वीकारत सरकारला सज्जड इशारा दिला. राजकीय हेतूने एनआरसीचे काम करण्यात आले. जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र, आम्ही ते घडू देणार नाही, असे ममतांनी म्हटले. दरम्यान, एनआरसीच्या मुद्‌द्‌यावरून बसपच्या प्रमुख मायावती यांनीही केंद्रातील आणि आसाममधील भाजपच्या सरकारांवर शाब्दिक तोफ डागली.

-Ads-

ती सरकारे संकुचित राजकारणापोटी अनेक वर्षे आसाममध्ये राहत असलेल्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, एनआरसीच्या मुद्‌द्‌यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. आसाममध्ये अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी एनआरसीची योजना करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)