…तर भाजप कार्यालयांना टाळे ठोकू

नेवासा फाटा – भीमा-कोरेगावच्या घटनेतील आरोपी मनोहर भिडे गुरुजींसह इतरांना अटक करण्याची मागणी नेवासा तालुक्‍यातील बहुजन, दलित समाजातील कार्यकर्ते, नेत्यांनी केली आहे. त्यांना अटक न झाल्यास भाजपच्या कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा नेवासा तालुका लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संजय सुखधान यांनी म्हटले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमून काही आरोपींची नावे घेतली; त्यात मनोहर भिडे गुरुजींचे नाव निष्पन्न झाले असून, तीन महिने उलटले तरी त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. भाजप सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. जर घटनेत संबंध नसेल तर स्वत: भिडे यांनी चौकशीला सामोरे जाणे गरजेचे होते. परंतु, केवळ जातीय तेढ व देशामध्ये दंगली घडविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. भिडे गुरुजींना अटक न झाल्यास बहुजन नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेसाठी मुंबईला मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आम्हीही पाठिंबा देत असून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारला जाग येण्यासाठी व भिडे गुरुजींना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही 24 मार्च रोजी नेवासा तालुक्‍यातील भाजपचे कार्यालय बंद करू व टाळे ठोकू, असा इशारा सुखधान यांनी दिला.

निवेदनावर नेवासा तालुका लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांच्यासह ऍड. बन्सीभाऊ सातपुते, सुनील वाघमारे, गणपत मोरे, येडूभाऊ सोनवणे, विजय काळे, विलास शेटे, अजय त्रिभुवन, राहुल सूर्यवंशी, सनी चक्रनारायण, आनंद चक्रनारायण, कानिफनाथ कणगरे, राजेंद्र भुजंग, विशाल शिनगारे, अनिल वाडेकर, भीमराव इंगळे, रामभाऊ मगरे, कैलास बोर्डे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)