… तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू – संजय राऊत

बेळगाव – बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून इथे राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. बेळगाव  महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीये. ते बेळगावमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले  आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावी. शिवसेनेने पक्ष स्थापनेपासून बेळगावच्या मुद्दा लावून धरला आहे. शिवसेनेने बेळगाववरुन अनेक आंदोलनेही केली आहेत. सध्या बेळगावचा विषय कोर्टामध्ये आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत अनेकवेळा बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसेना कायमच बेळगावमधील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)