…तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करा!

आम्हाला पंतप्रधानांशी भांडायचे नाही, मात्र भिडेंवर कारवाई झाली नाही, तर कुणाच्या शेपटीवर पाय ठेवायचा आणि कुठले प्रकरण कधी काढायचे हे आम्हाला चांगलेच कळते.
– ऍड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ.

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंवर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी दिला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याबाबत अगोदर या रावसाहेब पाटीलवर आणि त्याच्या माध्यमातून भिडेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व बाबी स्पष्ट असतानाही जर पोलीस भिडेंवर कारवाई करत नसतील, तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करावी, अशी संतप्त मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले. आजचे आंदोलन हा निव्वळ सरकारला इशारा असून आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)